प्रदूषण मुक्त गणेशोत्सव

सण-समारंभ उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण तसेच गणेशोत्सवामध्ये होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी डॉल्फिन नेचर ग्रुप हि आपल्या संस्थेने सण २००० पासून इको फ्रेंडली गणेश उत्सव प्रकल्प (प्रदूषणमुक्त गणेश उत्सव प्रकल्प) हाती घेतला. सण सुरु होण्यापूर्वी एक महिना संस्थेचे सदस्य वेगवेगळ्या शाळा-कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थी शिक्षक यांना याबाबत प्रबोधन करतात व विद्यार्थ्यां मार्फत पालकांपर्यंत , घर-घरापर्यंत पोहोचतात...जागृती करतात. माहितीपत्रक द्वारे व प्रत्यक्ष मार्गदर्शन करून प्लास्टर ऐवजी शाडूच्या मूर्तीची किंवा पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करणे, या मुर्त्यांची घरच्या घरी मोठ्या भांड्यामध्ये विसर्जन करणे , तसेच निर्माल्याचे विसर्जन ही घराजवळ बागेमध्ये छोटा खड्डा काढून त्यात करणे ... याबाबत संस्था सातत्याने प्रबोधन करत असून त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर , सातारा , रत्नागिरी , रायगड , आदी अनेक जिल्ह्यांमध्ये आज संस्थेचे हे जनजागृतीचे कार्य सुरु आहे. डॉल्बीमुक्त उत्सवसाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी गणेश मंडळांना ही जागृत करण्याचे काम संस्था अनेक वर्षे करत आहे.

याशिवाय दरवर्षी संस्थेचे सदस्य गणेश विसर्जन काळात प्रत्यक्ष्य निर्माल्य संकलन करतात. सांगली मधील कृष्णा घाटावर विसर्जनाच्या पाचव्या , सातव्या , नवव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशी दिवशी दुपार पासून तो रात्री उशिरा पर्यंत गणेश भक्तांना आवाहन करत डॉल्फिन चे सदस्य निर्माल्य संकलन करतात . गणेश भक्तांचाही अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळतो. सर्व भक्त निर्माल्य पाण्यामध्ये टाकण्या ऐवजी डॉल्फिन च्या सदस्यांकडे निर्माल्य सुपूर्द करतात. याकामी महापालिकेचे ही सहकार्य लाभते. डॉल्फिनच्या सातत्यपूर्ण जागृतीमुले पर्यावरणपूरक मूर्त्यांना मागणी वाढत आहे तसेच घरच्या घरी विसर्जनकडे ही गणेश भक्तांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सण २००० पासून सुरु असलेल्या या डॉल्फिन ग्रुप च्या कार्यात आता इतर संस्था ही हळू-हळू सहभागी होऊ लागले आहेत.