सागरेश्वर

सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील मानव निर्मित अभयारण्य. वृक्षमित्र धो.मो.मोहिते यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले अभयारण्य. या अभयारण्यात सांबर , चितळ , काळवीट या प्रकारच्या हरणांसह रानडुक्कर तरस असे अनेक प्राणी अश्रयास आहेत.पावसाळ्यामध्ये पडणारे पाणी या अभयारण्य क्षेत्रातून वाहून बाहेर जात असलेने या ठिकाणी प्राण्यांना डिसेंबर पासून प्रशासनाला टँकरने कृत्रिम पाणवठ्यावर पुरवावे लागत होते. यामुळे सन २००८ पासून डॉल्फिन नेचर ग्रुपने पावसाचे पाणी अडवून प्राण्यांना पावसाळ्या नंतर हि बराच काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या साठी श्रमदानातून वनबंधारे उभारणी हा प्रकल्प हाती घेतला. २००८ ते २०१४ या कालावधीत संस्थेने २२ वनबंधारे उभारले. दरवर्षी ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे पाश्चात्य पद्धतीने साजरा होणाऱ्या फ्रेंडशिप डे दिवशीआपण निसर्गाशी हि मैत्री करू शकतो ही संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत ऐनापुरे यांनी सर्व प्रथम मांडली आणि प्रत्यक्षात निसर्गाशी मैत्री या नव्या संकल्पनेची सुरवात केली.
या दिवशी लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांना पर्यंत संस्थे चे सर्व सदस्य आणि निसर्गप्रेमी यात सहभागी होऊ लागले. मोठंमोठी दगड उचलताना न थकणारे हात खऱ्या अर्थानी निसर्गाशी एकरूप होऊन गेले. संस्थेच्या या कार्यात शालेय हरितसेनेचे विद्यार्थी देखील सहभागी होऊ लागले. या विद्यार्थ्यां साठी संस्थे तर्फे निसर्ग मित्र कार्यशाळेचे आयोजन हि दरवर्षी करण्यात येते . या प्रकल्पमुळे या बंधाऱ्यात अगदी कडक उन्हाळ्यात देखील अभयारण्यातील प्राण्यांना पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. अभयारण्याचे तत्कालीन वनक्षेत्रपाल मा.नायकल साहेब यांनी १३ मे २०१३ ला काढलेला बंधाऱ्याचा फोटो याचा सबळ पुरावा देतो. तत्कालीन वनमंत्री आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले.