वृक्षारोपण

पर्यावरण संतुलन टिकून राहण्यासाठी उपयुक्त झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे . यासाठीच शहर परिसरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागामध्ये ओसाड क्षेत्रावर वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे काम संस्थेने गेली अनेक वर्षे सातत्याने सुरु ठेवले आहे. सांगली मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी डॉल्फिन ने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. कुपवाड रोड वरील पार्श्वनाथनगर , बालाजीनगर , अकुजनगर येथील ओपन स्पेस तसेच रस्त्या लगत दोन्ही बाजूस वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन. शिंदे मळा, निसर्ग पार्क सोसायटी चा परिसर , पोलीस लाईन ओपन स्पेस , स्फूर्ती चौक , नेमिनाथनगर , विश्रामबाग , अशा अनेक भागांमध्ये , शाळांमध्ये , ओपन स्पेस मध्ये संस्थेने वृक्षारोपण व संवर्धन मोहीम अतिशय प्रभावीपणे राबविली आहे.

याशिवाय मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर परिसर , आटपाडी तालुक्यातील जकाई देवी मंदिर परिसर , आदी अनेक भागांमध्ये वृक्षारोपणाचे काम संस्थेने हाती घेतले आहे. पर्यावरण दृष्ट्या ग्राम विकास या नवीन संकल्पने अंतर्गत बामणोली गावामध्ये २५० वृक्षांचे रोपण व संवर्धन करून डॉल्फिन संस्थेने ग्रामस्थांना जागृत ही केले.